जेव्हा रणवीरच्या गाण्यावर थिरकतात डोनाल्ड ट्रम्प


सध्या सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. व्हाईट हाऊसचे सोशल मीडिया मुख्य डैन स्काविनो यांनी तोच व्हिडीओ त्यांच्या टि्वटरवर देखील शेअर केला आहे.


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये माझा तिरस्कार करणाऱ्यांना पागल करण्याचा हेतू नाही. या गाण्याच्या माध्यमातून पण एका सुंदर आठवड्याचा शेवट आणि एका सुंदर दिवसाची सुरुवात करता येईल असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसचे सोशल मिडीयाचे मुख्य अधिकारी आणि राष्ट्रपतींचे डैन स्काविनो हे सहायक आहेत. ट्रम्प यांच्या 2016 अभियानाच्या सोशल मिडीयाचे मुख्य अधिकारी होते.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कार्यप्रणालीचा देशातील जी लोक तिरस्कार करतात. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी त्यांनी शेअर केला आहे. रणवीर सिंह मल्हारी गाण्यावर ज्यामध्ये थिरकताना पाहयला मिळतो. हा व्हिडीओ तयार केलेला असून त्यामध्ये रणवीरच्या जागी ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आलेला आहे.

Leave a Comment