ब्रिटनच्या ‘दि स्ट्रक्चरल अॅवॉर्ड्स 2019’ साठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निवड


नवी दिल्ली – ब्रिटनच्या ‘दि स्ट्रक्चरल अॅवॉर्ड्स 2019’ साठी जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचे लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याची निवड करण्यात आली आहे.

या पुतळ्याचा समावेश या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 49 वास्तूंच्या सूचीमध्ये केला आहे. चीनमधील खेळाचे स्टेडियम, लडंनमधील पाच सितारा हॉटेलमध्ये 22 मीटर खोल असलेले तळघर आणि सैनफ्रांसिस्को मधील भूकंपविरोधी इमारतीचा या सूचीमध्ये समावेश आहे. लंडनमध्ये 15 नोव्हेंबरला या पुरस्काराची घोषणा होणार आहे

या पुरस्काराचा मुख्य उद्देश्य अभियंत्यांनी केलेल्या प्रमुख कार्याची जगभरात जागरुकता निर्माण करणे हा आहे. गेल्या 52 वर्षांपासून हा पुरस्कार ‘इन्स्टिट्यूशन ऑफ स्ट्रॅक्चरल इंजिनियर्स’ प्रदान करीत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना झाला होता.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षा दुप्पट उंच आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे. सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Leave a Comment