देसी गर्लचा भावजयीसोबत आनंदी आनंद गडे!


सध्या सुट्ट्यांच्या मूडमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा असून ती आपल्या कुटुंबियांसोबत मियामी येथे आपला क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा आणि तिची भावजय सोफी टर्नरसोबतचे पूलसाईड असलेले काही फोटोज व्हायरल झाले आहेत. स्विमकॉस्च्युममध्ये असलेल्या त्या दोघी खूपच हॉट दिसत आहेत.

कायम वेगवेगळया कारणांमुळे बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन ठरलेली प्रियंका चोप्रा ही चर्चेत असते. अशातच मध्यांतरी ती गरोदर असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. सध्या इंटरनेटवर तिचे हे हॉट फोटो चर्चेत आहेत. ब्राऊन कलरची बिकिनी तिने घातली होती.

ती काही फोटोंमध्ये सोफी टर्नरसोबत बोलताना दिसत आहे. त्या दोघींमधील चर्चेमुळे त्यांच्यातील बाँडिंग चांगली असावी, असेच वाटत आहे. तसेच सोफी टर्नर ही ग्रीन कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. एक आनंद पसरलेला सोफीच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.

प्रियंका चोप्रासोबत ती वेळ घालवून प्रचंड आनंदी दिसत आहे. फोटोंवरून असे दिसत आहे की त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी असून त्यांना एकमेकांची कंपनी प्रचंड आवडते, असे वाटते.

Leave a Comment