‘गोल्डन ग्लोब’साठी संजय दत्तच्या ‘बाबा’ चित्रपटाची निवड


आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्डन ग्लोब २०२०’ साठी विदेशी भाषा या श्रेणीमध्ये मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केलेल्या संजय दत्तच्या पहिल्याच ‘बाबा’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.


वडील आणि मुलाचे अबोल नाते ‘भावनेला भाषा नसते’, अशी दमदार टॅगलाईन असलेल्या ‘बाबा’ चित्रपटातून उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात आपल्या मुलासाठी संघर्ष करणारा ‘बाबा’ पाहायला मिळतो. अभिनेता दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. संजय दत्तच्या निर्मितीअंतर्गत तयार झालेला पहिलाच चित्रपट गोल्डन ग्लोबमध्ये झळकल्यामुळे त्याने ट्विटरवर आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Comment