रामराणा आणि सितामातेच्या भूमिकेत दिसणार हृतिक, दीपिका


दंगलफेम नितेश तिवारी आता आणखी एका एपिक कथेवर काम करत असून ते रामायणावर एक चित्रपट तयार करणार आहेत. हा चित्रपट थ्री डी मध्ये शूट केला जाईल असे समजते. या चित्रपटाची स्टारकास्ट कोणती याची चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भगवान रामाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनशी संपर्क साधला गेला आहे आणि त्याने ही भूमिका साकारायला कबुली दिली आहे.

रामायणात सीतामातेची भूमिका कोण करणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र त्यासाठी दीपिका पदुकोन हिचे नाव नक्की केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. नितेश यांनी सांगितले, रामायणावर काम करतोय, पण हे काम आव्हानात्मक आहे. यात देशाच्या सन्मानाचा भाग आहे कारण रामायण आपला राष्ट्रीय वारसा आहे. त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगु आणि तमिळ मध्ये करण्याचा विचार असून त्यासाठी ५०० कोटींचे बजेट आहे. नितीश सध्या छीछोरे वर काम करतोय तर हृतिकचा सुपर ३० हिट झाला आहे. दीपिका छपाक चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर रामायणाचे काम सुरु होणार आहे.

Leave a Comment