दुसऱ्यावेळी अमेरिकेत सामना खेळतेय टीम इंडिया


भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील टी २० सिरीज आजपासून सुरु होत असून पहिला सामना अमेरिकेतील फ्लोरिडा मधल्या सेन्ट्रल ब्रोवार्ड रिजनल स्टेडियमवर ३ ऑगस्टला होत आहे. या स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची टीम इंडियाची ही दुसरी वेळ असून येथे पहिला विजय नोंदविण्यास टीम इंडिया उत्सुक आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत क्रिकेट फारसे लोकप्रिय नाही. तेथे क्रिकेट फार कुणी खेळत नाही आणि पहातही नाही. फ्लोरिडा मधील हे लाउंडरहिल स्टेडियम अमेरिकेतील आयसीसी मान्यताप्राप्त एकमेव स्टेडियम आहे.

टीम इंडियाने या स्टेडियमवर पहिला सामना २०१६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता पण त्यात १ धावेने पराभव पत्करला होता. दोन सामन्याची ही टी २० सिरीज होती त्यात दुसरा सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला विजयाची प्रतीक्षा आहे. या स्टेडीयम वर आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरवात २०१० मध्ये झाली असून आत्तापर्यंत ८ टी २० सामने खेळले गेले आहेत. त्यात सहा सामने वेस्ट इंडीजने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार सामने खेळले आहेत. या स्टेडीयमची क्षमता २० हजार प्रेक्षकांची आहे मात्र येथे अजून एकही कसोटी किंवा वनडे सामना खेळला गेलेला नाही.

Leave a Comment