यंदाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार पत्रकार रवीश कुमार यांना जाहिर


मुंबई : यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांना हा पुरस्कार हिंदी टीव्ही पत्रकारितेत योगदानासाठी मिळाला आहे. या पुरस्काराने अरुण शौरी, पी साईनाथ यांच्यानंतर रवीश कुमार यांच्या रुपाने आणखी एका भारतीय पत्रकाराचा सन्मान होणार आहे.


रवीश कुमार हे यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या पाच जणांमध्ये एकमेव भारतीय आहेत. रवीश कुमार यांच्यासह हा पुरस्कार म्यानमारचे को सी विन, थायलंडच्या अंगहाना नीलपायजित, फिलिपाईन्सचे रमेंड आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रवीश कुमार यांना पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिला जात असल्याचे रॅमन मॅगसेसे कमिटीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रवीश कुमार यांचा कार्यक्रम ‘प्राईम टाईम’ हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामान्यांच्या अडचणींवर भाष्य करतो, असं रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशनने म्हटले आहे.

Leave a Comment