अमेरिकेतील या हॉस्पीटलमधील चुकून पिऊ नका पाणी, नाहीतर व्हाल गरोदर!


एक आश्चर्यचकित करणारी घटना अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका वर्षात तब्बल 36 नर्स येथील एका चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार मिसूरी येथील चिल्ड्रन मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटलमध्ये घडला आहे.

अमेरिकेतील मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटल हे एक नावाजलेले चिल्ड्रन हॉस्पिटल आहे. इंटेसिव्ह केअर युनिटच्या 36 नर्स याठिकाणी एका वर्षात गर्भवती झाल्या. 20 नर्सची प्रसूती आतापर्यंत झाली आहे. तर, या वर्षाच्या अखेरपर्यंत बाकीच्या नर्सची प्रसूती होण्याची शक्यता आहे.

आपल्या फेसबुक पेजवर या नर्सचा ग्रुप फोटो या हॉस्पिटलने शेअर केला आहे. या फोटोला एक कॅप्शन देत त्यामध्ये म्हटले आहे की, याठिकाणी आलेल्या मुलांसाठी आमच्या इंटेसिव्ह केअर नर्सरीच्या नर्सनी रात्र-दिवस घालवली. त्या स्वत: त्यावेळी गर्भवती होत्या. आयसीएनच्या या कुटुंबाला शुभेच्छा.

या संदर्भात ‘गुड मॉर्निंग अमेरिका’ने दिलेल्या अहवालानुसार, एक मजेशीर वाक्य या हॉस्पिटलमधील एक नर्स एलिसन रोन्कोने शेअर केले आहे. त्या म्हणाल्या की, तुम्हाला ज्यावेळी गर्भवती व्हायचे आहे, त्यावेळी येथील पाणी प्या, असे सांगून हॉस्पिटलमधील रुग्ण मजा घेतात. 7 जानेवारी, 2019 रोजी एलिसन रोन्कोने एका मुलाला जन्म दिला होता. दरम्यान, या नर्सनी सांगितले की, एकमेकींची आम्ही काळजी घेतो. लहान मुले आम्हाला आवडतात म्हणून मुलांची सुद्धा जास्त काळजी घेतो.

Leave a Comment