सुरू होणार सनीबाईंची शाळा


बॉलीवुडची बेबी डॉल अर्थात सनी लिओन ही चक्क मुंबईत शाळा सुरु करत आहे. तिने या शाळेसाठी मुंबईतील जुहू हे ठिकाण निवडले आहे. देशभरात आपल्या शाळेच्या सनी लिओन तब्बल 25 शाखा सुरु करणार आहे. दरवेळेस आपल्या चाहत्यांना मादक अदांनी घायाळ करणारी सनी लिओन शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत आहे. सनी लिओन ही शाळा फक्त लहान मुलांसाठी काढणार आहे.

मुंबईतील जुहू परिसरामध्ये सनी लिओन शिशुवर्ग सुरु करत असून मुलांच्या कल्पकता आणि कलागुणांना वाव देणारे उपक्रम या शिशुवर्गात राबवण्यात येणार आहेत. शाळा काढण्याची प्रेरणा सनीला मुलगी निशा हिच्यापासून मिळाली. सनी लिओन मुंबईसह देशाभरातील २५ ठिकाणी शिशुवर्ग सुरू करणार आहे. सध्या या शिशुवर्गाच्या स्वरूप कसे असेल यावर सनी लिओन काम करत असून लवकरच सनीच्या शाळेच्या नावाचीही घोषणा होईल. घरात कडक शिस्तीची असल्याचे सनी सांगते.

Leave a Comment