बॉलीवूडचे कलाकार ‘येथे’ जेवणासाठी करतात लाखो रुपये खर्च


चित्रिकरणानिमित्त देश-विदेशात फिरणारे बॉलीवूड कलाकार आपल्या तब्येतीची कशी काळजी घेतात आणि त्यासाठी ते दिवसभरात काय आहार घेतात त्याचबरोबर त्यांच्या आहारावर कोण लक्ष ठेवते असे अनेक प्रश्न आपल्या मनात घोंघावत असतात. पण याकरिता त्यांच्याकडे स्वत:चे फिटनेस ट्रेनर्स असतात. पण या कलाकारांच्या डाएटविषयी आणखी एक खुलासा झाला आहे.

चित्रिकरणार दरम्यान कलाकार त्यांचा परफेक्ट आहार कसा घेतात. त्यासाठी रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर हे कलाकार एका सेवेचा फायदा घेतात. त्यांच्या हेल्दी डाएटची ते काळजी घेतात. या कलाकारांना Pod Supply नावाची सेवा जेवण पुरवते. ही एक मील सर्विस आहे. जी, हेल्दी डाएटसाठी लाखों रुपये चार्ज करते.

’83’ चित्रपटाच्या शूटिंग शेल्डूलमध्ये रणवीर सिंह याच सर्विसमधून जेवणाची सर्व्हिस घेत असल्याचे बोलले जाते. ‘मलंग’ चित्रपटाच्या शेड्यूलदरम्यान आदित्य रॉयने येथूनच सर्विस घेतली होती. Pod Supply या सर्विसद्वारेच अक्षय कुमार, अनिल कपूरही आपल्या डाएटची काळजी घेतात.

जेवणावर लाखो रुपये खर्च करुन सेलिब्रिटींना हेल्दी डाएट फॉलो करणे परवडणारे आहे. पण सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. आता सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी पॉड सप्लाय लवकरच पॉड लाइट सर्विस सुरु करणार आहेत. जे लोक त्यांच्या डाएटबाबत अतिशय सतर्क असतात, त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेत असतात अशा सामान्य लोकांसाठी ही सर्विस फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment