‘मिशन मंगल’चा मराठी प्रोमोवर रितेशचे भन्नाट ट्विट


कॉमेडी, रोमँटीक, अॅक्शन आणि गंभीर सामाजिक विषय अशा विविध प्रकारचे आशय असलेल्या चित्रपटांतून बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यामुळे, काहीच अक्षयसाठी अशक्य नाही, असे अनेकदा त्याचे चाहते म्हणतात. पण, हे आता सामान्यांशिवाय कलाकारांनीही मान्य केले आहे.

नुकताच नारी शक्तीचे वर्णन करणारा मिशन मंगल या चित्रपटाचा हिंदी प्रोमो रिलीज करण्यात आला. अक्षयने आपला आवाज ये सिंदूर दूर तक जाएगा अशा ओळी असलेल्या या प्रोमोला दिला आहे. आता यापाठोपाठ अक्षयच्याच आवाजातील या चित्रपटाचा एक मराठी प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. अक्षयची मराठी भाषेतील स्पष्टता ज्यात ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.


रितेशने हाच प्रोमो शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. अशी कोणती गोष्ट आहे का, जी हा माणूस करू शकत नाही? एक नंबर!! कडक…मिशन मंगलमधील महिलांनाही शुभेच्छा, असे रितेशने म्हटले आहे. अक्षयने रितेशच्या या ट्विटवर उत्तर देत त्याचे आभार मानले आहेत. नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न विज्ञान हे करत असते. त्यामुळे, तुमचे स्वतःचेच छोटे छोटे अडथळे दूर करा. तोच प्रयत्न मीदेखील करत आहे. बाकी मराठी प्रोमोमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा, असे अक्षयने म्हटले आहे.

Leave a Comment