अखेर रिलीज झाले ‘साहो’चे ‘इन्नी सोनी’ गाणे


‘बाहुबली’ स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘साहो’ चित्रपटातील दुसरे गाणे ‘ईन्नी सोनी’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘साहो’चे गाणे सुंदर बनवण्यासाठी व्हिज्युअल एक्सपेरिमेंट केले गेले आहेत. तर अॅक्शन सीक्वेंस लार्जर दॅन लाइफ केले गेले आहेत. निर्मात्यांनी गाण्यांवरही मोठी रक्कम खर्च केली आहे. ‘ईन्नी सोनी’ गाण्याच्या शूटिंगशी निगडित काही खास गोष्टी समोर आल्या आहेत.

‘ईन्नी सोनी’ गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी टीम 100 लोकांसोबत ऑस्ट्रियाच्या प्रसिद्ध स्कीइंग रिसॉर्ट ‘स्टायबाय ग्लेशियर-टॉप ऑफ टायरोल’ ला गेली होती. लोकेशन मॅनेज करणाऱ्या लोकांनी ती पूर्ण जागा गाणे शूट करणाऱ्या लोकांना दिली होती.


‘ईन्नी सोनी’ हे गाणे जगातील सर्वात लांब झुलणाऱ्या फुटब्रिजवर चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा लोकेशन दाखवण्याचा टीमचा प्रयत्न होता, जोआतापर्यंत इतर हिंदी चित्रपटात खूप कमी पाहायला मिळायचा.

जेरमॅट टुरिझमनुसार चार्ल्स कुओनेन 1621 फूट लांब आहे. याची उंची 279 फूट आहे. हा जगातील सर्वात लांब पायी यात्रा सस्पेंशन ब्रिज आहे. जॉल्सबर्गच्या सुंदर लोकेशनवरदेखील हे गाणे शूट केले गेले आहे. गुरू रंधावा आणि तुलसी कुमार यांनी हे गाणे गायले आहे. तर वैभवी मर्चेंटने कोरियोग्राफी केली आहे.

Leave a Comment