रशियाची इकातेरिना काराग्लानोव्हा ही सुंदरी इन्स्टाग्राम स्टार होती. नुकतीच तिची हत्या झाल्याचे वृत्त असून 85000 हून अधिक इंस्टाग्रामवर 24 वर्षांच्या इकातेरिनाचे फॉलोअर्स आहेत.
तिच्या चाहत्यांचे नेहमीच ती कुठे गेली, कुठे फिरतेय, तिने कसा फोटो काढला आहे याकडे लक्ष असायचे. ती नियमितपणे प्रवास आणि त्याचे सुंदर फोटो शेअर करायची. ही गोष्ट एका सोशल मीडिया स्टारची खर तर शोकांतिका आहे.
तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तिच्याशी संपर्क होत नसल्याने तक्रार दाखल केली. तिच्या घरात पोलिसांनी प्रवेश केल्यावर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला.
या इन्स्टाग्राम स्टारच्या मृत्यूमुळे रशियात खळबळ उडाली आहे. नुकतीच इकातेरिनाने डिग्री मिळवली होती आणि ती डॉक्टर झाली होती. इकातेरिना काराग्लानोव्हा हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केलेली नाही. पण तपास सुरू आहे.