गोव्यातून मद्यपी आता आणू शकतात दोन पेक्षा अधिक बाटल्या


गोवा हे फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचे लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून जाते. गोव्यात पर्यटकांची समुद्रकिनारे, पार्टी, चविष्ट अन्न यासोबत दारू अशा अनेक गोष्टींमुळे रेलचेल असते. दारू गोव्यात स्वस्त असल्याने तिथून दारू आणण्याचा प्रयत्न अनेक पर्यटक करतात. पण तुम्ही सध्या दारूच्या फक्त दोन बाटल्या गोव्याबाहेर घेउन येऊ शकता. पण तुम्ही लवकरच दोन पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या घेऊन येऊ शकणार आहात. यामध्ये लक्ष घालून सध्याच्या नियमामध्ये बदल करण्याचा विचार गोवा सरकार करत आहे.

विधानसभेत बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली. गोवा सरकार हा प्रयत्न गोवा पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी करणार आहे. लवकरच याबाबत शेजारील राज्यातील उत्पादक अधिकाऱ्यांशी बोलून गोवा सरकार निर्णय घेणार आहे. सध्या विमानाने प्रवास करणारे पर्यटक गोव्यातून दारूच्या प्रती व्यक्ती 2 बाटल्या घेऊन जाऊ शकतात. पण हे कायदे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या गोवा सीमेवर कडक आहेत.

सध्या सुमारे 500 कोटी रुपये उत्पन्न घाऊक दारू विक्रीवर आकारण्यात आलेल्या विविध उत्पादन शुल्कातून राज्याला मिळत आहे. तर दरवर्षी सुमारे आठ दशलक्ष पर्यटक किनारपट्टीवरील या राज्यात किरकोळ दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये येतात. सध्या एक देशी बनावटीची विदेशी दारूची बाटली आणि स्थानिक दारूची बाटली अशा दोन बाटल्या पर्यटकांना नेण्याची परवानगी आहे. पण यामध्ये वाढ झाली तर गोव्याला मिळणाऱ्या महसुलातही वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment