यामुळे ट्रोल झाला बॉलीवूडचा सिंघम


‘भुज- द प्राईड इंडिया’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये बॉलीवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असून या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मांडवी येथे पार पडल्यानंतर तेथीलच एका मंदिरात अजय गेला. अजयने नागनाथ महादेव मंदिरात जात त्या ठिकाणी श्रद्धासुमने अर्पण केली. या क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, अजयवर अनेकांनीच याच फोटोंमुळे नाराजीही व्यक्त केली.

View this post on Instagram

જે લોકો અજય દેવગણના ચાહક હશે એ બધા જાણતા જ હશે કે અજય દેવગણ ભોળાનાથનો બોવ મોટો ભક્ત છે. ભુજમા શૂટીંગ ચાલી રહ્યુ છે એની ફિલ્મનું ત્યારે શ્રી યોગેશ બોક્ષા અજય દેવગણને આજે માંડવીના ખૂબ જૂના અને જાણીતા મહાદેવના મંદિર, નાગનાથ મહાદેવે લઇ ગયા. તસ્વીરમા મહાદેવની પૂજા કરતા ફિલ્મ અભિનેતા અજય દેવગણ અને શ્રી યોગેશ બોક્ષા. #BhujThePrideOfIndia #AjayDevgn

A post shared by Aditya Gadhavi (@adityagadhviofficial) on


डेनिम शॉर्ट्स आणि टीशर्ट घातलेला इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये अजय दिसत आहे. ही एकच बाब पकडत त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाली. तू मंदिरात असे कपडे घालून जाऊ शकत नाहीस असे म्हणत कोणी त्याला खडे बोल सुनावले, तर कोणी त्याची चूक निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर त्याची खिल्लीही उडवली गेली. मुळात अजय स्वत: देवधर्म आणि रुढी परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व देतो असे त्याच्या निकटवर्तीय सूत्रांकडून सांगण्यात आले असून, त्या दिवशी चित्रीकरणानंतर तो मोकळ्या वेळेत मंदिरात गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment