बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाचा घटस्फोट


बॉलीवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप हे काही आता नवीन नाही. कारण ती आता सर्वसामान्य बाब बनली आहे. अनेक बॉलीवूड जोडपी विभक्त झाल्याचे वृत्त वेळोवेळी आम्ही तुम्हाला दिले आहेच. पण आता अजून एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेत्री दिया मिर्जा हिने तब्बल 11 वर्षांचे पतीसोबतचे नाते संपुष्टात आणल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर दोघांनीही हा निर्णय सहमताने घेतला असल्याचेही तिने सांगितले.

दिया, साहिल संघासोबत 2014 मध्ये विवाहबद्ध झाली. ते दोघे लग्नापूर्वी अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. दियाने ही बातमी जाहीर करताना एक खास नोट लिहिली आहे. दियाने या नोटमध्ये आपल्या कुटुंबियांचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत. तसेच या निर्णयाचा प्रसारमाध्यमांनी आदर करावा, अशी विनंती देखील केली आहे. तसेच जरी साहिल आणि माझा संसार मोडला असला तरी एकमेकांचे आम्ही कायम मित्र राहू. आम्हाला आमच्या 11 वर्षांच्या नात्याबद्दल आनंद आहे, असेही तिने लिहिले आहे. साहिल आणि दिया बिजनेस पार्टनर्स होते. दियाची ही पोस्ट चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे.

दिया रहेना है तेरे दिल में’, ‘तो तुमको ना भूल पायेंगे,’ ‘दम,’ ‘दस,’ ‘लगे रहो मुन्नाभाई’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली. तसेच अलिकडे आलेल्या ‘संजू’ चित्रपटात तिने संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारली होती. पण दियाला अभिनेत्री म्हणून फारसे यश लाभले नाही. दियाने बॉबी जासूस या चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

Leave a Comment