15 लाखांच्या त्या मेसेजनंतर लोकांच्या बँकेबाहेर रांगा


मुंबई : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. केरळमधील लोकांनी यानंतर बँकेबाहेर नवे खाते उघडण्यासाठी गर्दी केली. यावेळी लोकांच्या लांबच लांब रांगा बँकेबाहेर लागल्या.

लोक सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजला खरे मानून पोस्टात बँक खाते उघडण्यासाठी बँकेसमोर जमले. रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या मते, पंतप्रधानांचे 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करण्यासाठी योजना बनवत आहे.

केरळच्या प्रसिद्ध पर्यटक स्थळ मुन्नारच्या चहाच्या मळ्यात काम करणारे हजारो लोक हे मजूर आहेत. हेच मजूर बँकेत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसबाहेर जमले होते. ज्या व्यक्तीचे पोस्टात बँक खाते आहे. केंद्र सरकार त्या व्यक्तीला 15 लाख रुपये देणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. त्यानंतर या बँकापूढे लोकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली.

यादरम्यान, आपली सर्व कामे सोडून लोक पोस्ट ऑफिसबाहेर रांगेत उभे झाले. या मेसेजचा एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम झाला की, गेल्या तीन दिवसांमध्ये एकट्या मुन्नारमध्ये 1050 पेक्षा जास्त नवे खाते उघडण्यात आले. यापूर्वी देवीकुलम आरडीओ कार्यालयातही अशीच गर्दी पाहायला मिळाली होती. सोशल मीडियावर तेव्हाही केंद्र सरकार जमीन-घर देण्याची योजना बनवत असल्याचे मेसेज फिरत होते.

Leave a Comment