आजपासून बदलेल्या नियमांचा थेट परिणाम होणार आपल्या खिशावर


मुंबई : आजपासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहेच. पण त्याचबरोबर आजपासून काही नियमांत मोठे बदल झाल्यामुळे ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या हे नियम माहित असणे गरजेचे आहे. आजपासून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे स्वस्त होत आहे तर युनियन बँकेकडून कर्ज घेणेही तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

आता आपल्या खिशाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे परवडू शकणार आहे. यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांवर १२ टक्के जीएसटी टॅक्स लावला जात होता. पण आजपासून या वाहनांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अशावेळी १० लाख रुपये किंमतीची तुम्ही एखादी इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर तुम्हाला त्यावर जवळपास ७० हजार रुपयांचा फायदा मिळू शकेल.

आजपासून देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ऑनलाईन फंड ट्रान्सफर मोफत केले आहेत. ‘एसबीआय’कडून आयएमपीएस चार्ज रद्द करण्यात आले आहेत.

Leave a Comment