‘अॅव्हेंजर्स’च्या ‘थानोस’ची आठवण करुन देणार अधिरा


संजय दत्तने आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने ‘केजीएफ 2’ या आगामी चित्रपटातील आपल्या भूमिकेचा खुलासा केला. त्याने यादरम्यान यातील व्यक्तीरेखेबद्दलही काही मनोरंजक गोष्टीही सांगितल्या. संजूबाबाच्या बाबतीत यंदाच्या वाढदिवसाला दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत.

सर्वात पहिले म्हणजे त्याचा ‘केजीएफ 2’मधील लूक रिलीज झाला. तर दुसरे म्हणजे त्याच्या होम प्रॉडक्शनच्यावतीने निर्मित होत असलेल्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्याने यावेळी बोलताना ‘केजीएफ 2’च्या ‘अधिरा’ या व्यक्तीरेखेबद्दलचा खुलासा केला आहे.

अत्यंत खतरनाक अशी ‘केजीएफ 2’ चित्रपटातील अधिरा ही व्यक्तीरेखा आहे. तो यासारख्या भूमिकांचा नेहमीच शोध घेत असतो. खूप पॉवरफुल्ल अशी अधिराची व्यक्तीरेखा आहे. तुम्ही जर अॅव्हेंजर्स पाहिला असेल तर तुम्हाला थानोस माहिती असेल. त्याच्यासारखाच अधिरा आहे. खतरनाक गेटअपसारखीच ही व्यक्तीरेखा खतरनाक आहे. अशाच प्रकारच्या व्यक्तीरेखेच्या शोधात मी होतो, असे संजय दत्त म्हणाला.

Leave a Comment