भारतीय हवाई दलाने लाँच केला ‘Indian Air Force: A Cut Above’ व्हिडीओ गेम


भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते भारतीय हवाई दलामध्ये करियर करणासाठी तरूणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुधवारी ‘Indian Air Force: A Cut Above’ हा व्हिडीओ गेम लाँच केला आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांचे पात्र या व्हिडीओ गेममध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर मिग-21पासून सुखोई, मिराज, एमआय-17 सारखी लढाऊ विमाने तुम्ही उडवू शकतात. या व्हिडीओ गेममध्ये बालाकोट एअर स्ट्राइकची झलकही दिसणार आहे. व्हिडीओ गेमच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने केलेली ऐतिहासिक कामगिरी अनुभवता येणार आहे. आपल्या ऑफिशअल ट्विटर खात्यावर हवाई दलाने गेल्या आठवड्यात टीझर जारी करत या व्हिडीओ गेमची माहिती दिली होती.

व्हिडीओ गेम डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हा व्हिडीओ गेम फक्त एकच व्यक्ती खेळू शकतो. हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मोबाइल व्हर्जनमध्ये खेळता येणार आहे. या व्हिडीओ गेमचे मल्‍टीप्‍लेअर व्हर्जन ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. खराखुरा पायलट असल्याचा रोमांचक अनुभव ‘Indian Air Force: A Cut Above’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्यांना मिळेल असा दावा भारतीय हवाई दलाने केला आहे.

हा गेम खेळणाऱ्यांना इतर फ्लाइट सिम्युलेटर गेमप्रमाणेच पहिल्यांदा ट्रेनिंग दिली जाणार आहे. खेळाडूला त्यानंतरच लढाऊ विमान उडवण्याची संधी मिळणार आहे. विविध लढाऊ विमाने आणि अनेक मिशनचा या गेममध्ये समावेश आहे. सर्व मिशन पार करणाऱ्या खेळाडूला भारतीय हवाई दलाकडून खास भेट मिळणार आहे.

Leave a Comment