Budweiser बिअर कंपनीवर 3 वर्षाची बंदी


नवी दिल्ली : दिल्लीत 3 वर्षांसाठी सर्वात महागडी दारु बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या Anheuser-Busch InBev (AB InBev) या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारने ही कारवाई या कंपनीने कर न भरल्यामुळे केली आहे. AB InBev या कंपनीची Budweiser, Hoegaarden आणि Stella Artois यांसारख्या अनेक प्रसिद्ध बिअर बनवणारी म्हणून ओळख आहे.

AB InBev ही एक बिअर बनवणारी कंपनी असून या कंपनीने 2016 मध्ये SABMiller या कंपनीला 100 बिलीयन डॉलरमध्ये विकत घेतले होते. कंपनीला गेल्या काही वर्षांपासून टॅक्स कमी भरायला लागावा या हेतूने SABMiller या कंपनीच्या बॉटलवर डुप्लीकेट बारकोड्स लावण्यात येत होते. दिल्ली सरकारच्या लक्षात ही बाब आल्यानंतर दिल्ली सरकार गेल्या 3 वर्षांपासून याची चौकशी करत होते. दिल्ली सरकारने AB InBev या कंपनीवर त्यात दोषी आढळल्याने 3 वर्षाची बंदी घातली आहे.

पण हे आरोप खोटे असल्याचा दावा AB InBev या कंपनीने केला आहे. तसेच आम्ही याविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. दरम्यान दिल्ली सरकारने गेल्या आठवड्यात AB InBev या प्रसिद्ध दारु विक्रेत्या कंपनीला 3 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील AB InBev कंपनीची दोन गोडाऊनही सील करण्याचे आदेशही दिले आहे. दरम्यान दिल्ली सरकारच्या या कारवाईमुळे AB InBev या दारु विक्रेत्या कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे

Leave a Comment