‘ड्रामा क्विन’ काय म्हणते लग्नाच्या व्हायरल फोटोवर


नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बॉलिवूडची ‘ड्रामा क्विन’ राखी सावंत प्रसिद्धीझोतात असते. ती आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने सोशल मीडियावर तिचे ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. राखीने लग्न केले की काय? असे प्रश्न चाहते हे फोटो पाहून विचारत आहेत.

एका एनआरआय व्यक्तीसोबत राखीने गुप्तपणे लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर अलिकडेच रंगल्या होत्या. त्याचबरोबर तिचा विवाह सोहळा मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडल्याचेही बोलले गेले. पण आता स्वत:च एक खुलासा याबाबत राखीने केला आहे.

View this post on Instagram

bridel shooting

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


एका माध्यमाशी बोलताना राखीने सांगितले, की मी लग्न बंधनात अडकली नाही. मी फक्त ब्रायडल फोटोशूट केले आहे, असे म्हणून तिने लग्नाचे वृत्त फेटाळले आहे. यापूर्वीही राखीच्या लग्नाच्या चर्चा झाल्या होत्या. ती दीपक कलालसोबत लग्न करणार होती. पण तिने पुढे हे लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment