
आपल्या समाजात सर्वसाधारणपणे महिला या संस्कारी आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या असतात अशीच मान्यता आहे. पण याबाबतीत काही पुरुष मंडळींचे वेगळेच मत आहे. त्यांना महिला संस्कारी आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या नसतात असे वाटते. अशात काही पुरुष आजच्या महिलांबद्दल काय विचार करतात, कोणत्या स्वभावाच्या मुलींना डेट करायला त्यांना आवडते आणि कोणत्या मुलींपासून ते लांब राहू इच्छितात त्याबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
या मुलींसोबत डेटवर जाण्याआधी अनेकदा विचार करा!
अशा मुलींना डेट करायला भारतीय पुरुष घाबरतात ज्या फार मॉडर्न किंवा फार टिपीकल असतात. आपल्या मुठीत ठेवणाऱ्या किंवा फार स्त्रीवादी महिलांना डेट करायला पुरुषांना आवडत नाही. त्याचबरोबर पटकन राग ज्या मुलींना येतो अशा मुलींपासून पुरुष चार हात लांब राहणेच पसंत करतात. ज्या मुली फार शो- ऑफ करतात अशा मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचारही ते करत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुष मंडळी फार पार्ट्या करणाऱ्या मुलींपासून लांब पळतात. तसेच त्यांना करिअरवादी मुलींही फारशा आवडत नाहीत.
