दोन पेग घेत ‘या’ दिग्गज फलंदाजाने ठोकल्या होत्या 150 धावा!


क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात 365 धावांची तुफानी खेळी आणि एकाच षटकार 6 षटकार लगावण्याची किमया सर्वात यशस्वी अष्टपैलू फलंदाज सर गारफिल्ड सोबर्स यांनी केली होती. सोबर्स यांनी नुकतेच 83व्या वर्षात पदार्पण केले. पण त्यांना आजतागायत बंधनात राहणे पसंत नाही. त्यांची क्रिकेट जगतात आजही आपल्या मर्जीचा मालक, अशी ओळख आहे.

गॅरी यांचा जणू रात्रभर नशेत राहणे आणि सकाळी तीच नशा मैदानावर खोऱ्याने धावा करत उतरवणे हा छंदच होता. त्यांनी दारू पिऊन आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात 1973साली सुरु असलेल्या कसोटी सामन्यात 31 धावांवर पहिल्याच दिवशी नाबाद असलेल्या गॅरी यांनी रात्रभर पार्टी केली. त्याचबरोबर सामना सुरु होण्याआधी ते ड्रेसिंग रूममध्ये सुध्दा दारू पीत होते. त्यांनी फलंदाजी करत असताना ब्रेक घेत 1-2 पेग लगावले होते, त्यांनी या सामन्यात 150 धावांची आश्चर्यकारक खेळी केली.

डॉन ब्रॅडमन यांनी सर गॅरी सोबर्स यांचे कौतुक करत सलाम केला होता. वेस्ट इंडिजकडून 1954साली पदार्पण केलेल्या गॅरी यांनी 1974मध्ये निवृत्ती घोषित केली. गॅरी सोबर्स यांचे भारत कनेक्शनही चांगलंच गाजले. अभिनेत्री अंजू महेंद्रू आणि गॅरी यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी साखरपुडाही केल्याच्या बातम्या त्यावेळी झळकल्या होत्या. पण हे नाते अंजू यांच्या आई-बाबांनी केलेल्या विरोधामुळे जास्त काळ टिकू शकले नाही.

Leave a Comment