पिगी चॉप्सचा वाढदिवस आणि महागडा केक


बॉलीवूड बरोबरच हॉलीवूडमध्ये ठसा उमटविणारी आपली पिगी चॉप्स ३७ वर्षाची झाली. गायक निक जोनास बरोबर सात फेरे घेऊन ती आता परदेशात स्थिरावू पाहते आहे. तिच्या लग्नाच्या, हनिमूनच्या चर्चा अजून सुरु असतानाच तिच्या वाढदिवसाला पती निकने दिलेली पार्टी आणि वाढदिवसासाठी तयार करून घेतलेला खास केक सोशल मिडियावर सध्या हॉट टॉपिक बनला आहे.

वाढदिवसाच्या या खास पार्टीत प्रियांकाचा ड्रेस खास आकर्षणाचा बिंदू बनला होता त्याचप्रमाणे वाढदिवसाचा केक ही उपस्थितांना आकर्षून घेत होता. पाच लेअर मध्ये ४ फुट उंचीचा हा केक डिव्हाइन डेलीकसीज यांनी बनविला होता आणि केकच्या डिझाईनची कल्पना प्रियांका पती निक जोनास याची होती. या केकचा एक भाग लाल रंगाचा तर दुसरा गोल्डन रंगाचा होता. प्रियांकाचा ड्रेस सुद्धा याच कॉम्बिनेशनचा होता. व्हॅनीला आणि चॉकलेट फ्लेवरच्या या केकसाठी तब्बल ३ लाख ४५ हजार रुपये मोजले गेले होते. या केकचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले गेले होते.

Leave a Comment