मुळशी पॅटर्नचा प्रसिद्ध डायलॉग माझ्या ‘विठ्ठला’मुळेच सुचला


मुळशी या गावातील वास्तवावर आधारित आणि प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाच्या कथेसोबत यातील डायलॉगनेही प्रेक्षकांची मने जिंकली. पण दिग्दर्शक प्रविण तरडे हे डायलॉग आपल्याला आपल्या वडिलांमुळे सुचल्याचे सांगतात.

आपल्या फेसबुकवरून प्रविण तरडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांचे वडील यात आपल्या शेतात राबताना दिसत आहेत. ते फोटोत भात शेतीत काम करताना दिसत आहेत. प्रविण यांनी याच फोटोला खास कॅप्शनही दिले आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सलाम केला आहे.

हे आहेत माझे वडील विठ्ठल तरडे. मला त्यांच्याकडे पाहूनच शेती विकायची नसते ती राखायची असते.. हा डायलॉग सुचला. आज वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील शेतीचा एक तुकडा ही न विकता शेती सांभाळतात. महाराष्ट्रातील अशा प्रत्येक शेतकऱ्याला सलाम, असे प्रविण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment