या महिला क्रिकेटपटूने पुरुष क्रिकेटपटूलाही जमणार नाही असा विक्रम करून दाखवला


नवी दिल्ली: एक विक्रम ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पॅरीने आपल्या नावावर केला आहे. एलिस इंग्लंडच्या विरुद्ध 47 धावा करत आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 1000 धावा व 100 विकेट्स घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

आतापर्यंत 104 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने 28 वर्षीय एलिसने खेळले आहे. तिने यामध्ये 1005 धावांसह 103 विकेट्स घेतल्या आहेत. नोव्हेंबरमधील वर्ल्ड टी 20 च्या अंतिम सामन्यातच तिने 100 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर काल झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सामन्यात तिने 1000 धावांचा टप्पा ओलांडून विक्रमाची नोंद केली. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1414 धावांसह 98 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 1471 धावा करत 88 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने पुरुष आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहेत. 94 सामन्यात त्याने 2331 धावा तर, न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने 2272 आणि विराट कोहलीने 2263 धावा केल्या आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये शाहिद आफ्रिदी 99 सामन्यांत 98 विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा 97 विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Comment