फेसबुकचे ‘हे’ फीचर वाढवणार चॅटिंगची गंमत


नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी नेहमी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक नवनवीन अपडेट आणत असते. फेसबुकच्या माध्यमातून अनेक जण संवाद साधत असतात. अनेक फीचर फेसबुकवर आहेत पण त्याची माहिती फारच कमी युजर्सना असते. फ्रेंड्स लिस्ट नावाचे एक फीचर फेसबुकवर असून युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट या फीचरच्या मदतीने तयार करू शकतात. वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय फेसबुकवर मिळत असल्याने युजर्ससाठी हे फीचर फायदेशीर आहे. आपल्या आवडीची फ्रेंड लिस्ट आता युजर्सना तयार करता येणार असल्यामुळे चॅटिंगची गंमत वाढवणार आहे.

फेसबुकवर सर्वांना एकाच फ्रेंड लिस्टमध्ये ठेवण्याऐवजी फॅमिली, क्लोज फ्रेंड, स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, ऑफिस अशा वेगवेगळ्या लिस्ट तयार करता येतात. अनेक गोष्टी फेसबुकवर शेअर केल्या जातात. पण फक्त आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तींसोबत त्यापैकी काही फोटो हे शेअर करायचे असतात. फ्रेंड लिस्ट फीचरचा त्यावेळी खूप उपयोग होणार आहे. पब्लिक, फ्रेंड्स किंवा ओन्ली मीचा पर्याय फेसबुकवर आधी पोस्ट शेअर करताना मिळायचा. या नव्या फिचरमुळे यापुढे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.

नवी फ्रेंड लिस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी फेसबुकवर जाऊन लॉग-इन करा. पण तुम्ही यासाठी जर एखाद्या पीसी किंवा लॅपटॉपचा उपयोग करत असाल तर ते अधिक सोयीस्कर ठरेल. फेसबुक होमपेजवर मेन्यूमध्ये जाऊन ‘Friend Lists’ मेन्यूवर क्लिक करा. अधिक माहितीसाठी see more येथेही क्लिक करा. त्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल. उजव्या बाजूला ‘+create list’ वर क्लिक करा. युजर्स हव्या असलेल्या नावाने लिस्ट तयार करू शकतात. त्या लिस्टमध्ये ज्यांना सामील करायचे आहे त्यांचे नाव लिहून सिलेक्ट करा. त्यानंतर ‘create’ वर क्लिक करा.

नव्या फ्रेंड लिस्टचा वापर करण्यासाठी फेसबुक लॉग-इन केल्यानंतर कोणताही फोटो किंवा पोस्ट शेअर करा. Privacy ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर युजर्सना Public, Friends सारखे काही ऑप्शन दिसतील. See more वर क्लिक करा. त्यानंतर Specific friends वर क्लिक करा आणि लिस्टचे नाव सर्च करा. तुम्हाला ज्या लिस्टमध्ये फोटो किंवा पोस्ट शेअर करायची आहे ती सिलेक्ट करा. फक्त त्या लिस्टमधील मेंबर्ससोबत युजर्स पोस्ट शेअर करू शकतात.

Leave a Comment