‘द लायन किंग’ने पार केली शंभरी


काही दिवसांपूर्वीच हॉलिवूडच्या ‘द लायन किंग’ चित्रपटाचा रिमेक रिलीज झाला. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळसह इंग्रजीतही प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही चित्रपटाला मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आता शतक गाठले आहे.

चित्रपटाने ९ दिवसात म्हणजेच शनिवारपर्यंत ९८.४८ कोटींची कमाई केली. तर दहाव्या दिवशी म्हणजेच रविवार या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. पण, रविवारच्या कमाईचे आकडे अद्याप समोर आले नाहीत.

किंग खान शाहरुखने चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य पात्र ‘मुफासा’ला आवाज दिला आहे. तर, सिंबा’ या पात्राला त्याचा मुलगा आर्यनने ‘आवाज दिला आहे. संगणक अॅनिमेटेड म्यूझिकल असलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर आपली जादू आणखी किती दिवस टिकवून ठेवणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment