‘सुपर ३०’ बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यात देखील ‘सुपर फास्ट’


तीन आठवड्यापूर्वी गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने काही दिवसांपूर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केल्यानंतर चित्रपटाच्या कमाईत आता तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

चित्रपटाच्या कमाईचे आकडे शुक्रवारपर्यंत २ कोटीच्या घरात होते. पण, चित्रपटाने शनिवारी ४.४७ कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहता लवकरच १५० कोटींचाही टप्पा हा चित्रपट पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

दरम्यान आतापर्यंत १२०.३२ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आता आणखी किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Leave a Comment