भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘या’ हॉलीवूडपटांनी जमावला बक्कळ गल्ला


आपल्या देशात हॉलीवूडपटांचा देखील मोठा प्रेक्षकवर्ग असल्यामुळे भारतात अनेक हॉलीवूडपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहेत. त्यातच आता बॉक्स ऑफिसवरील यंदाच्या वर्षात ३ हॉलीवूडपटांच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाने ३६७ कोटींचे भारतात कलेक्शन केले असून यावर्षीचा तो सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. जगभरात २५ एप्रिलला हा चित्रपट रिलीज झाला होता. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले होते.



डिजनीचा द लायन किंग हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजीत १९९४ साली आलेल्या ‘द लॉयन किंग’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट रिलीज झाला. आतापर्यंत १०० कोटींचा गल्ला चित्रपटाने पार केला असून चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे.

तर कमाईच्या बाबतीत मार्वल स्टुडिओचा कॅप्टन मार्वल चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. ८ मार्चला रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर ८५.५० कोटींचा गल्ला गाठला.

Leave a Comment