आजम खान यांचे डोळे फोडणाऱ्याला १ लाख रुपये देणार भाजप युवा मोर्चा


आग्रा – संसदेच्या कार्यकारी अध्यक्षा रमा देवी यांच्याबद्दल समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आग्रामध्ये आझम खान यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच आजम खान यांचे डोळे काढणाऱ्यांना १ लाखांचे बक्षीस भाजयुमो उपाध्यक्ष बंटी बघेलने जाहीर केले आहे.

आजम खान यांनी संसदेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समाजमाध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. आजम खान यांना अटक करण्याची मागणी आग्र्याचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केली. आजम खान यांनी यापुढे जर असे वक्तव्य केले तर त्यांना मारहाण करण्याची भाषा भाजयुमोचे नितेश शिवहरे यांनी केली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आजम खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Comment