
जयपूर – राजस्थान दौर्यावर असताना जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, कर्नाटकमधील काही काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे भाजपने सरकार स्थापन केल्याचे दिसते. राजस्थानातही अशाच प्रकारची परिस्थिती आगामी काळात होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस शासित राज्यांमध्ये निर्माण होऊ शकते कर्नाटकसारखी परिस्थिती
रामदास आठवले पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ज्याप्रमाणे जनतेने लोकसभा निवडणुकांनंतर कौल दिला आहे. त्यावरुन जनता मोदीसोबत आहे असेच दिसते. प्रत्येकाला कर्नाटकचा खेळ पाहिल्यानंतर असे वाटते की, काँग्रेसची सत्ता पुढच्या काळात येण्याची शक्यता नसेल तर, काँग्रेसपासून लोक दूर जात आहेत. ते म्हणाले की, केवळ राजस्थानच नव्हे तर, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तेथे भाजप सरकार स्थापन करु शकते. आठवले म्हणाले, एखादा आमदार जर अशा पद्धतीने पक्षाचा राजीनामा देतो तर तो त्यांचा घटनात्मक हक्क असून लोकशाहीला कोणताही धोका नाही.
