पिंक स्विम सूटमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली प्रियंका चोप्रा


पती निक जोनास सोबतचे काही फोटो प्रियंका चोप्रा जोनासने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत. ती पती निकसोबत या फोटोजमध्ये खूप रोमँटिक स्टाईलमध्ये पोझ देत आहे, पण तिने या फोटोजमध्ये पिंक स्विम सूटसोबत गुलाबी रंगाचे हातमोजे घातले आहेत. पण प्रियंकाला या गुलाबी हातमोज्यांमुळे खूप ट्रोल केले जात आहे.

View this post on Instagram

My 💓

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


तिचे फॅन्स हे जाणून घेऊ इच्छित आहेत की, स्विमिंगदरम्यान तिला अखेर हातमोजे का घालावेसे वाटले. तिच्या फोटोवर एका यूजरने कमेंट करून विचारले, कोण स्विमिंगदरम्यान हातमोजे घालते ? असे एका यूजरने तर आणखी एका यूजरने, मला कुणी हे समजावून सांगू शकते का, हातमोजे स्विम सूटसोबत घालणे कुठली फॅशन आहे. तेही खाजगी कार्यक्रमात… तू तुझ्या पतीमध्ये एवढी हरवली आहेस की, सर्वकाही विसरली आहेस. त्याचबरोबर एका युझरने लिहिले, फॅशननुसार हातमोजे घालणे हिशेबाने जर जास्तच झाले.

View this post on Instagram

❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


हे फोटोज प्रियंकाच्या 37 व्या बर्थडे सेलिब्रेशन आणि मियामीच्या व्हॅकेशनचे आहेत. पण प्रियंकाला या फोटोजसाठी खूप ट्रोल केले जात आहेत. त्यांच्या फॅन्सच्या नजरा सोशल मीडियावर गुलाबी हातमोज्यावरच खिळल्या. या सुट्ट्यांमध्ये तिचे संपूर्ण कुटुंब होते. प्रियंकाची बहीण अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील येथे स्पॉट झाली होती.

Leave a Comment