यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मुस्लिम खेळाडूंच्या सुविधेसाठी जपानमध्ये फिरती मशीद


टोकियो – पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोमध्ये फिरत्या मशिदी तयार करण्यात आल्या आहेत. ही सुविधा विविध देशातून येणाऱ्या खेळाडू व प्रेक्षकांना नमाज पढण्यास कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून देण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेर या मशिदी उभ्या करण्यात येणार आहेत. हात धुण्यापासून नमाजासाठी मॅट्सची सुविधा यात करण्यात आल्या आहेत. टोकियोतील स्पोर्टस अँड कल्चर इव्हेंट कंपनीने या मशिदी तयार केल्या आहेत.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीसारखे मोठ्या ट्रकचे रुपांतर करण्यात आले आहे. या जेथे उभ्या राहतील तेव्हा रिमोटने त्याची मागील बाजू उघडेल. एक शिडी बाहेर येईल. त्यानंतर आतील भागाचे ५५१ चौरसफूट आकाराच्या हॉलमध्ये रुपांतर होईल. यात ५० लोक नमाज पढू शकतात.

दरम्यान टोकियोमध्ये चार मशिदी असल्यामुळे बाहेरच्या देशातून येणाऱ्या मुस्लिमांना नमाज पढण्यास अडचणी होत्या. या मशिदी त्यांना त्यामुळे योग्य राहतील. १९३५ साली जपानमध्ये पहिली मशीद काबे येथे तयार करण्यात आली. देशभरात सुमारे ६० मशिदी आहेत. फिरत्या मशिदीचा वापर २०१६ मध्ये इंडोनेशियात सुरू करण्यात आला. तो यशस्वीही ठरला. प्रयोगानुसार इंडोनेशियात हिरव्या रंगाची व्हॅन जेथे गर्दी असते तेथे हमखास दिसून येते.

Leave a Comment