या चित्रपटातील हॉट लुकसाठी वाणीने घेतली अशी मेहनत


अभिनेत्री वाणी कपूर आपल्याला ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी वॉर चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसली होती. ती बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाणीचा बिकिनी अवतार या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसला. ज्यामुळे तिची खूप चर्चाही झाली.

View this post on Instagram

Walking into the golden hour ☀️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


वाणीने या चित्रपटातील तिच्या बॉडीसाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. वाणी सांगते, प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळणे खूप आनंददायी असते. पण तुम्हालाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मी माझ्या फिटनेसवर या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर खूपच चांगले वाटले. परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी 30 वर्षीय वाणीने पिलेट्स आणि योगासोबतच जिम वेट ट्रेनिंगही घेतले होते.

View this post on Instagram

Walking into the golden hour ☀️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


वाणी म्हणाली, चित्रपटात कसे दिसायचे हे मला माहित होते. यासाठी मला डाएटिंग करणे आणि एकदाही मिल चिट न करणे सर्वात कठीण होते. वॉर चित्रपटात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment