युरोपातील या सुंदर शहराचे अवघ्या दीड हजार रुपयांत मिळते नागरिकत्व


बॉलीवुड कलाकारांचा युरोपीय देशांमध्ये विशेषत: इटलीत लग्न करण्याकडे विशेष ओढा आहे. फिरण्यासाठी पर्यटकही युरोपला अधिक पसंती देतात. एकीकडे सुंदर शहरांसाठी प्रसिद्ध असलेल्या युरोपात एक शहर असेही आहे ज्याला ‘सिटी ऑफ शेम’ असे म्हटले जाते. ‘मटेरा’ असे या शहराचे खरे नाव आहे. पण हे शहर भुकबळी, रोगराई आणि इतर कारणांमुळे बदनाम झाले आहे. पण आता या शहराचे रुप पुरते पालटले आहे. तसेच तुम्हाला केवळ दीड हजार रुपयांमध्ये नागरिकत्वही मिळू शकते.

जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक ‘मटेरा’ हे शहर आहे. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या भागातील या शहरात आज वीज नाही, पाण्यासाठी वणवण करावी लागते. आजही अनेक गुहा या ठिकाणी असल्यामुळे अंडरग्राउंड सिटी असेही शहराला म्हणतात. आधुनिक जगापासून दूर असलेल्या या शहरातील गुहेत लोक रहायचे. जंगली फळे खाऊन ते भीक भागायचे.

हे शहर दक्षिण इटलीच्या एका टोकाला असल्याने येथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. हे शहर 80 ते 90 च्या दशकात एवढे बदनाम झाले की ‘सिटी ऑफ शेम’च्या नावाने त्याला ओळखण्यात येऊ लागले. लोक गुहेत राहू लागले होते. आधुनिकता आणि विकास यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता.

‘मटेरा’तील लोकांनी 1950 नंतर स्थलांतर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 30 हजार लोकांनी काहीच वर्षांमध्ये ‘सिटी ऑफ शेम’ सोडले. तिथे जे काही लोक होते त्यांनी त्याच अवस्थेत राहणे पसंद केले.

येथील प्राचीनतेमुळे या शहराकडे काही काळानंतर चित्रपट निर्मात्यांची नजर वळली. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले. सरकारने पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे याच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर परदेशी पर्यटकांनाही या ठिकाणाचे आकर्षण वाटू लागले.

1993 मध्ये या शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळात युनेस्कोने केल्यानंतर येथील परिस्थिती सुधारली. या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना आता गुहेतील भिंतीचित्रे पाहता येतात. इटलीची सांस्कृतिक राजधानी म्हणून ‘सिटी ऑफ शेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला घोषित करण्यात आले आहे. येथील प्राचीन गुहांमध्ये हॉटेल्स सुरु करण्यात आली आहेत. स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या शहरात प्रदुषण होऊ नये यासाठी येथे गाडीने नाही तर पायी चालत फिरावे लागते. फक्त २२ डॉलर म्हणजे 1 हजार 526 रुपये देऊन ‘मटेरा’ शहरात वर्षभराचे नागरिकत्व मिळते. तुम्ही वर्षभर राहू आणि मनसोक्त या शहरात भटकू शकता.

Leave a Comment