स्विस हॉटेलने भारतीयांसाठी बनवला स्वतंत्र कायदा, हर्ष गोयंका यांनी घेतला


स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलने भारतीय पाहुण्यांसाठी खास कायदे बनवत नोटीस जारी केली आहे. त्या कायद्यांवर उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी यावर आक्षेप घेत टीका केली आहे.

हॉटेलमधील सुटीच्या वेळी ते आनंद घेऊ शकतील अशा नियमांची यादी करून स्वित्झर्लंडच्या हॉटेल गेस्टॅडने ‘भारतीय पाहुण्यांना’ संबोधित करताना नोटीस बजावली आहे. हा विशेष नियम जारी केल्याबद्दल हर्ष गोयंका यांनी ट्विट करुन भारतीयांना आक्षेप नोंदविला आहे.

हॉटेलचे मॅनेजर क्रिस्टीन मट्टी यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की भारतीय पाहुणे नाश्त्याच्या टेबलावरुन काहीही उचलणार नाहीत आणि तिथेच बसून जेवतील. नोटीसमध्ये असे देखील म्हटले आहे की, कृपया तुमच्याबरोबर काहीही घेऊन जाऊ नका, येथील पदार्थ फक्त न्याहारीसाठी आहे. जर तुम्हाला एखादी पिशवी हवी असेल तर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे मागून त्याचे पैसे भरावे.


नोटिसमध्ये असेही म्हटले आहे की, इतर पाहुणे देखील बुफेचा आनंद घेण्याची इच्छा आहे, म्हणून भारतीय अतिथींनी तेथे उपलब्ध भांड्यांचा वापर करावा.भारतीयांना आवाज न काढण्याच्या सूचना या नोटीसीमध्ये सांगण्यात आले आहे. तुमच्याशिवाय जगभरातील इतर अतिथी हॉटेलमध्ये मुक्काम करीत आहेत. त्यांना शांतता आणि निर्मळपणा हवा आहे, म्हणून आम्ही विनंती करतो की कॉरिडॉरमध्ये शांतता ठेवा आणि बोलकनीमध्ये जास्त जोरात बोलू नका.

हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही नोटीस शेअर करताना म्हटले आहे की हे संतप्त आणि अपमानास्पद आणि त्याचा विरोध करायला हवा. ते म्हणाले की ही नोटीस अशी धारणा निर्माण करणारी आहे. भारतीय जास्त जोरात बोलतात, ते असभ्य आहेत आणि पर्यटक म्हणून सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील नाहीत. भारतीय लोकांची प्रतिमा सुधारण्याची विनंतीही गोएंका यांनी केली. ते म्हणाले की, आता भारत आंतरराष्ट्रीय शक्ती बनत आहे, आमचे पर्यटक हे जागतिक राजदूत आहेत. आपल्या सर्वांनी एकत्रितपणे ही प्रतिमा बदलली पाहिजे.

गोएंका यांच्या ट्विटला उत्तर म्हणून बर्‍याच लोकांनी कबूल केले की भारतीय नागरिक जोरात बोलतात आणि असंवेदनशील आहेत, पण कोणत्याही हॉटेलबद्दल अशी नोटीस देणे म्हणजे वर्णद्वेष असल्याचे ते म्हणतात.

Leave a Comment