भारताला मिळाला नवीन यॉर्करकिंग


चेपॉक : भारतीय क्रिकेट संघात त्यांनाच स्थान मिळते जे प्रथम श्रेणीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करतात. अशाच एका गोलंदाजाच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची तुफान चर्चा तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्येही होत आहे. जी पेरियास्वामी असे या गोलंदाजाचे नाव आहे. श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसीथ मलिंगा आणि भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह यांची आठवण तुम्हाला त्याची गोलंदाजी पाहून येईल.


पेरियास्‍वामी तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चेपॉक सुपर गिल्‍लीजकडून खेळतो. डिंडीगुल ड्रेगन्‍स विरोधात तो या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरला. बुमराहप्रमाणे पंचांच्या जवळून गोलंदाजी 25 वर्षांचा हा गोलंदाज करतो. त्यामुळे फलंदाजांना चेंडूचा अंदाज घेणे कठीण जाते. 135-140 प्रतितास किमी गतीने पेरियास्‍वामी गोलंदाजी करतो, त्यामुळे फलंदाजांची तारांबळ उडते. महत्वाची गोष्ट म्हणजे पेरियास्वामी एका डोळ्याने पाहू शकत नाही, तरी त्याची गोलंदाजी अव्वल ठरत आहे.

आतापर्यंत 4 सामन्यात या हंगामात पेरियास्वामीने 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने केवळ 5.73च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची गोलंदाजी पाहता त्याच्यासाठी लवकरच भारतीय संघाचे दरवाजे उघडतील.

Leave a Comment