
नवी दिल्ली – ग्राहकांकरिता एक भन्नाट ऑफर ऑनलाईन अन्नपदार्थ घरी पोहोचविण्याची सेवा देणाऱ्या झोमॅटोने आणली आहे. अमर्यादित थाळी (इन्फिनिटी डायनिंग) या सेवेमधून ग्राहकांना देण्यात येणार आहे.
झोमॅटो ग्राहकांना देत आहे ही भन्नाट ऑफर
गोल्ड मेंबरशिप असलेल्या ग्राहकांना अमर्यादित थाळीची सेवा ही देण्यात येणार आहे. झोमॅटोने ज्या रेस्टॉरंटबरोबर भागीदारी केली आहे, त्याच रेस्टॉरंटमध्ये ही सेवा मिळणार आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील ३५० रेस्टॉरंटबरोबर झोमॅटोने प्रारंभिक ऑफर म्हणून करार केला आहे. या सर्व हॉटेलला कमीत कमी ३.५ मानांकन वापरकर्त्यांनी दिलेले आहे.
झोमॅटोचे सहसंस्थापक तथा चिफ ऑपरेटिंग ऑफिसर गौरव गुप्ता यांनी झोमॅटो गोल्ड मेंबरशीपच्या १०० टक्के वाढ झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, झोमॅटो गोल्डचे सदस्यत्व जगभरातील नऊ देशामध्ये १.२५ दशलक्षहून अधिक लोकांनी स्विकारले आहे. कधीही न संपणाऱ्या या क्षेत्रात संधी आहेत. भारत हा अमर्यादित थाळीची सेवा देणारा पहिला देश ठरणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
