सईच्या हॉट अदांवर तिचे चाहते फिदा


मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सई आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सईची बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख आहे. सईचा गर्लफ्रेंड हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो सईने शेअर केले आहे. या फोटोतील सईचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.


सईने या फोटोमध्ये फ्लॉरल डिझाईनचा शॉर्ट टॉप परिधान केला आहे. सईचा या ड्रेसमधील अंदाज आणखीनच बोल्ड असल्याचे दिसून येत आहे. तिने या आकर्षक आणि सेक्सी ड्रेससह गर्लफ्रेंड चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. तिने या फोटोला तसे कॅप्शनच दिले आहे. तिच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. सईने गर्लफ्रेंड चित्रपटात अमेय वाघसोबत स्क्रीन शेअर केली आहे.


ती केवळ रुपेरी पडद्यावरील अंदाजातच बोल्ड आहे असे नाही तर सई तिची मते परखड आणि स्पष्टपणे मांडण्यातही तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिने चित्रपटसृष्टीत आणि भूमिकांमध्ये अभिनेत्रींच्या वर्चस्वाबाबत आपली ठाम मते मांडली होती. सईला स्त्रीप्रधान भूमिका असो किंवा एखादी बोल्ड भूमिका प्रत्येक भूमिकेत अभिनेत्री वरचढ ठरत असल्याचे वाटते. कितीही आव्हानात्मक भूमिका किंवा एखादी सामर्थ्य तसेच प्रभावशाली भूमिका असली तरी तिला अभिनेत्री पूर्णपणे न्याय देत असल्याचे सईने म्हटले होते.


लवकरच वैभव तत्त्वादीसोबत ‘पाँडेचेरी’ चित्रपटात सई दिसणार आहे. सईसह या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. पाँडेचेरीमध्ये या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


याशिवाय ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसोबत स्क्रिन शेअर करताना सई दिसणार आहे. पहिल्यांदाच ललित सोबत सई काम करताना दिसणार आहे. आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात सईने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.

Leave a Comment