परिणीती चोप्राला हवा आहे असा दादला


लवकरच जबरिया जोडी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या भेटीला येणार असून ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकतीच एका वाहिनीशी बोलताना तिने सांगितले की, जेव्हा एकता कपूरने मला सुरूवातीला चित्रपटासाठी फोन केला होता. तेव्हा हा चित्रपट मला एवढा इंटरेस्टिंग वाटला नाही.

परिणीतीने पुढे सांगितले की, मला त्यावेळी वाटले की कोणतातरी चित्रपट एकता बनवत आहे आणि ऑफर मला केली आहे. पण मी जेव्हा चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकली, ती ऐकल्यानंतर मी जोरजोरात हसू लागले. तिथे असलेले सगळे लोक हैराण होऊन माझ्याकडे पहात होते. मी हसत स्क्रीप्ट पूर्ण वाचली आणि या चित्रपटात काम करण्याचे ठरवले.

परिणीतीने पुढे म्हणते की, पटना चित्रपटात दाखवले गेले आहे. पण, लखनऊमध्ये चित्रीकरण केले आहे. याआधीही सिद्धार्थसोबत काम केले असल्यामुळे आमची चांगली बॉन्डिंग आहे. त्यामुळे काहीच फिल्मी वाटत नाही आणि मैत्रीमध्ये सर्व गोष्टी आणखीन चांगल्या होतात. मी पंजाबी आहे आणि मला बिहारी भाषा बोलायची होती. त्यामुळे तो देसी अंदाज येईल की नाही याचे थोडेसे दडपण होते. पण देसी भाषा शिकण्यासाठी मी आणि सिद्धार्थने प्रशिक्षकाची मदत घेतली. जेणेकरून आम्हाला रुपेरी पडद्यावर भूमिका साकारताना वास्तविक वाटले पाहिजे.

यादरम्यान लग्नाबाबत परिणीतीला विचारले असता तिने सांगितलं की, अद्याप माझ्या लग्नाबद्दल माझ्या घरातील कोणीच बोलत नाही. पण कामाबद्दल नक्कीच बोलतात. मुलाशी मी लग्न अशाच करेन ज्याचे माझ्यावर प्रेम असेल आणि आदर असेल. मुलगा सिनेइंडस्ट्रीतीला असला पाहिजे हे गरजेचे नाही. परिणीती चोप्रा व सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जबरिया जोडी चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी सोनाक्षी सिन्हा व बादशाह यांचा खानदानी शफाखाना प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment