शिबानीसोबतचा स्वीमिंग पूलमधील हॉट फोटो फरहानने केला शेअर


बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असणाऱ्या कपल पैकी अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे एक आहे. फरहान आणि शिबानी यांनी आपले नाते 2018 मध्ये जाहीररित्या मान्य केले.

नेहमीच फराहान आणि शिबानी एकत्र फिरताना दिसतात. तसेच ते दोघे सोशल मीडियावरही नेहमीच एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे एकत्र फिरणे त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान आणि शिबानीच्या ‘खुल्लम खुल्ला प्यार’वर त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत.

फरहान आणि शिबानी काही दिवसांपूर्वी सुट्टी एंजॉय करण्यासाठी परदेशात गेले होते. त्यांनी त्यावेळी समुद्रकिनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर फरहान आणि शिवानीचा आता पुन्हा एकदा स्वीमिंग पूलमधील एक फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे ते दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फरहानने स्वीमिंग पूलमधील एक फोटो शेअर केला आहे. शिवानी ज्यात रेड कलरच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. लवकरच फरहान आणि शिबानी लग्न करणार असल्याचे बोलले जात असले तरीही शिबानी किंवा फरहानकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

फरहानची अशाप्रकारे हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने याआधीही शिवानीसोबतचे अनेकदा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लवकरच प्रियांका चोप्रा सोबत ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून फरहान अख्तर भेटीला येणार आहे. फरहान पहिली पत्नी अधुनाशी काडीमोड झाल्यावर शिबानीसोबत रिलेशिपमध्ये आहे.

शिबानी दांडेकरला एका मुलाखतीत फरहानशी असललेल्या नात्याबाबत विचारले असता ती म्हणाली, मी कोणती गोष्ट सिक्रेट ठेवणाऱ्यांपैकी नाही. पण मला कोणत्याच गोष्टीचा गाजावाजा करायची गरज नाही.

Leave a Comment