
पब्जी गेम खेळणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. या गेमची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. पण हा गेम काहींच्या मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे चालत नाही. अशा लोकांसाठी पब्जीने लाईट व्हर्जन भारतात लाँच केला आहे. त्यामुळे पब्जी गेम आता आता कमी रॅम असणाऱ्या मोबाईलमध्येही चालू शकतो.
आता कमी रॅममध्ये चालू शकते पबजीचे लाईट व्हर्जन
काही सुधारणा या लाईट व्हर्जनमध्ये करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन हा गेम कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये चालू शकतो. हेवी गेम कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये खेळता येत नाही, ज्यामुळे फोनही हँग होतात. ज्या यूजर्सकडे आता कमी रॅम म्हणजे 2 जीबी पेक्षा कमी रॅमचे स्मार्टफोन आहेत ते आता हा गेम सहजपणे खेळू शकतात.
सर्व यूजर्सला हे नवीन व्हर्जन एकसारखा अनुभव देईल. पब्जीच्या मूळ व्हर्जनप्रमाणेच लाईट व्हर्जन हे काम करेल. प्लेअरला या व्हर्जनमध्ये स्वत: चालतानाही त्याला फील करु शकतात. तसेच काही निवडक गेम मोडमध्ये प्लेअर्सला नवीन हत्यारही मिळतील. यामुळे प्लेअरला नवीन पद्धतीने अटॅक आणि डिफेन्स करण्यासाठी मदत मिळेल.
पब्जी मोबाईल लाईट एक छोटे अॅप आहे. एकावेळी 60 यूजर्स यामध्ये एकत्र गेम खेळू शकतात. याचा अर्थ जुन्या पब्जी स्टाईलमध्येही असा खेळ खेळला जात होता. पण शेवटच्या 10 मिनिटाच्या खेळात जलद गती पाहायला मिळेल. पब्जी यूजर्स हा लाईट व्हर्जन प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतात. हा लाईट व्हर्जन फोनमध्ये 400MB ची स्पेस घेईल.
