”केजीएफ चॅप्टर 2′ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज


गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दक्षिणेचा सुपरस्टार यशचा चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर 1’ने धमाल केली होती. प्रेक्षकांनी या कन्नड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. नुकतेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा दुसरा भाग ‘केजीएफ चॅप्टर २’चे पोस्टर रिलीज केले आहे.


चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज करून सांगितले की, ‘अधीरा’ (केजीएफ चॅप्टर 2 ‘अधीरा’) च्या पत्राबद्दल अधिक माहिती 29 जुलैला सकाळी 10 वाजता सांगितली जाईल. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरद्वारे ‘अधीरा’ नावाच्या भूमिकेची लोकांना ओळख करून दिली गेली, ज्यामुळे चित्रपटाबद्दल एक रहस्य निर्माण केले गेले आहे. हे पोस्टर रहस्यमय आणि रंजक आहे. ज्यामध्ये एक बंद मूठ आणि त्यामध्ये गंभीर चेहऱ्याच्या वाघाची प्रतिमा असलेली दिसत आहे, ज्याचा अर्थ दृढ संकल्प, शक्ती आणि संघर्ष असा होतो.

यासोबतच असेही सांगितले जात आहे की, अभिनेता संजय दत्त चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये कोणत्यातरी मुख्य भूमिकेत दिसू शकतो. त्यासोबतच विशेष गोष्ट ही आहे की, 29 जुलैला अभिनेत्याचा वाढदिवसदेखील आहे. अशात अंदाज लावले जात आहेत की, ‘अधीरा’ च्या भूमिकेत तो दिसू शकतो.

Leave a Comment