बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेची पुन्हा एन्ट्री


मुंबई : पुन्हा बिग बॉसच्या घरात मराठी बिग बॉसचा स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची एन्ट्री होणार आहे. आज बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले जाणार आहेत. पण ते प्रेक्षकांना रविवारी टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने अभिजीत बिचुकले रवाना होणार आहे.

21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी चेक बाऊन्स प्रकरणी मुंबईतून ‘मराठी बिग बॉस’च्या सेटवरुन अटक केली होती. बिचुकलेंना त्यानंतर खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. मुंबईतून बिचुकले हे परत येण्याची शक्यता कमी असल्याने न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे हे तीन स्पर्धक बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये विविध कारणांमुळे घराबाहेर पडले आहेत. त्यातील पराग कान्हेरेची पुन्हा घरात एन्ट्री झाली होती, पण त्यानंतर तो दुसऱ्याच आठवड्यात एलिमिनेट झाला. बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेचीही पुन्हा एन्ट्री झाली असून ती सध्या बिग बॉसच्या घरात आहे.

Leave a Comment