बीसीसीआयच्या मध्यस्थीनंतर शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा


पोलीस रेकॉर्ड्सच्या भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचा अमेरिकन व्हिसा आधारावर रद्द करण्यात आला होता. घरगुती हिंसाचार आणि लैगिक अत्याचाराशी निगडीत तक्रार शमी विरोधात दाखल असल्याने त्याला अमेरिकन दुतावासाने व्हिसा नाकारला होता. परंतु शमीला अमेरिकन व्हिसा बीसीसीआयच्या मध्यस्थीनंतर देण्यात आला आहे.

भारत अमेरिकेत टी -20 चे तीन सामने खेळणार आहे. शमीची निवड या संघात झाल्याने त्याने अमेरिकन व्हिसासाठी अर्ज केला होता. परंतु त्याला अमेरिकन दुतावासाने व्हिसा नाकारला. घरगुती हिंसाचार आणि लैगिक अत्याचाराचा खटला शमीच्या विरोधात त्याची पत्नी हसीन जहाँने दाखल केला आहे. त्याचा व्हिसा याच कारणांमुळे नाकारण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्या मदतीनंतर शमीला व्हिसा देण्यात आला आहे.

बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी शमीचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकन दुतावासाला पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यामध्ये शमीच्या कामगिरीबद्दल तसेच विश्वचषकातील खेळाबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन दुतावासाकडून त्याला व्हिसा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment