निवृत्ती घेताच पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत मोहम्मद आमिर!


पाकिस्तानचा हुकमी गोलंदाज मोहम्मद आमिरने विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत शुक्रवारी आमिरने अधिकृत घोषणा केली असली तरी, स्थानिक क्रिकेट आमिर खेळत राहणार आहे.

36 कसोटी आमिरने सामने खेळले आहेत. यात 30.47च्या सरासरीने 2.85च्या इकॉनॉमीने 119 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानसाठी 27 वर्षीय आमिरने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. पण कसोटी सामनेच पाकिस्तानमध्ये होत नसल्यामुळे आपली निवृत्ती आमिरने जाहीर केली आहे.

दरम्यान आमिर निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. आता पाकिस्तानकडून आमिरला खेळायचे नसल्यामुळे त्याने ब्रिटनकडे नागरिकत्वाची मागणी केली आहे.

यासंदर्भात द ट्रिब्युनने दिलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये आमिरने ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या नरगिस मलिकशी लग्न केले होते. त्यामुळे ब्रिटेनकडे आमिरने नागरिकत्वाची मागणी केली आहे. आमिर सध्या लंडनमध्ये घर शोधत आहे.

त्याने कसोटी क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी 27 वर्षीय आमिर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. तसेच, आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान चांगली कामगिरी करेल, असे मत त्याने व्यक्त केले.

Leave a Comment