सहा वर्षीय युट्यूब स्टारने खरेदी केली तब्बल 55 करोड रूपयांची मालमत्ता


तुम्ही सहा वर्षांचे असताना काय करत होता ? आठवतय ? अर्थातत खेळत असाल अथवा तुम्ही नुकतेच शाळेत जायला सुरूवात केली असेल. मात्र साउथ कोरियाच्या एका 6 वर्षीय मुलीने चक्क 8 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 55 करोड रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.

बोरम नावाची ही 6 वर्षांची मुलगी युट्यूब स्टार आहे. तिने गंगम, सेऊल येथे ही जागा खरेदी केली आहे. इंटरनेट स्टार असलेल्या या चिमुकलीचे युट्यूबवर 30 मिलियन स्बस्क्रायबर्स आहेत. तिच्या ‘अ टॉय रिव्ह्यू’ या चॅनेलला 13.6 मिलियन तर व्हिडीओ व्लॉग चॅनेलला 17.6 मिलियन स्बस्क्रायबर्स आहेत.

कोरियामधील सर्वाधिक फोलोवर्स असणारी ती युट्यूबर आहे. तिच्या चॅनेलद्वारे तिला दर महिन्याला 3.7 बिलियनची कमाई होते.

ती युट्यूबर खेळण्याचे तसेच, खाताना, नुडल्स बनवताना असे व्हिडीओ बनवत असे. या तिच्या व्हिडीओला भरपूर पसंती मिळते. 2017 मध्ये गैर सरकारी संस्था ‘सेव द चिल्ड्रन’ला तिच्याविषी तक्रार देखील करण्यात आली होती. व्हिडीओमध्ये बोरम आपल्या वडिलांच्या पॉकिटमधून पैसे चोरत आहे आणि त्यानंतर ती रसत्यांवर गाडी चालवत आहे. संस्थेने पोलिसात तक्रार केल्यानंतर तिच्या पालकांनी युट्यूबवरून हे व्हिडीओ काढून टाकले होते.

बोरम ही केवळ एकमेव नाही जी एवढ्या लहान वयात युट्यूबमुळे प्रसिध्द झाली आहे. याशिवाय रयान काजी हा 7 वर्षीय युट्यूबर मागील वर्षी सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर ठरला होता. त्याच्या ‘रयान टॉय रिव्ह्यू’ या युट्यूब चॅनेलला 20.8 मिलियन स्बस्क्राईबर्स आहेत. याशिवाय 5 वर्षीय टायडस हा देखील असाच एक युट्यूब स्टार आहे. त्याच्या ‘ट्रव आणि कोर’ या चॅनेलला 3.1 मिलियन स्बस्क्रायबर्स आहेत.

Leave a Comment