असा आहे अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’मधील लूक


लवकरच ‘मिशन मंगल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अक्षय कुमार येण्यास सज्ज झाला आहे. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट रिलीज होणार आहे. अशात अक्षयच्या आणखी एका चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


अक्षयचा ‘बच्चन पांडे’ असे शीर्षक असणाऱ्या या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयचा हा वेगळा लूक चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. तो यात बच्चन पांडे नावाचे पात्र साकारणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहे.

फर्स्ट लूक पोस्टसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२० च्या ख्रिस्मसला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

Leave a Comment